जुगार प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील साळवीस्टॉप येथील एका शेडच्या कडेला आणि रहाटाघर येथील एका बंद टपरीच्या आडोशाला कल्याण मटका जुगार खेळ चालवणार्या दोघां विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1.55 वा.करण्यात आली.
राकेश प्रभाकर फगरे (32,रा.वरचा फगरवठार, रत्नागिरी), महेंद्र भालचंद्र मायनाक (62, रा.मांडवी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार,शनिवारी दुपारी पोलिस रहाटाघर, शिरगाव ते साळवीस्टॉप जाणार्या रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना साळवीस्टॉप येथील एका शेडच्या बाजुला आणि रहाटा घर येथील एका बंद टपारीच्या आडोशाला संशयित हे बेकायदेशिरपणे मटका जुगार खेळ चालवताना दिसून आले.त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1 हजार 255 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.याप्रकरणी संशयितांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम 1887 चे कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.