
भोके येथे गावठी दारूची विक्री करणाऱ्या वृद्धा विरोधात गुन्हा
रत्नागिरी: तालुक्यातील भोके येथे बेकायदेशीरपणे गावठी दारूची विक्री करणाऱ्या वृद्धा विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा.करण्यात आली.
विष्णू सोनू मायंगडे (60,रा.भोके मायंगडेवाडी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे.तो भोके फाटा येथे रस्त्यालगतच्या झाडा-झुडपाच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी आपल्या जवळ बाळगून असताना हि कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 510 रुपयांची 10 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.