
शीळ येथे तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी :शहरातील शीळ येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. ४) रात्री उघडकीस आली. सिद्धेश अशोक कदम (२६, रा. शीळ कदमवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत त्याच्या पालकांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सिद्धेशने नवीन बांधलेल्या घराच्या किचनमधील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची झाली आहे.