
नोकरीच्या आमिषाने १ लाख २० हजारांची फसवणूक
रत्नागिरी: नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची १ लाख २० हजारांची फसवणूक करणाऱ्या प्रौढाला शहर पोलिसांनी अटक केली. हा प्रकार १९ डिसेंबर २०१६ ते १७ जानेवारी २०१७ या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव जमिल हनिफ शेख (४३, रा. टीचर्स कॉलनी देवनार गोवंडी, मुंबई) असे आहे. त्याच्याविरोधात सुभाष सुंदरनाथ किड्ये (वय ५७, रा. बाजापेठ रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.