मानसकोंडला बोरवेल ब्लस्टिंग सुरुच; ग्रामस्थ आक्रमक
संगमेश्वर:- राष्ट्रीय महामार्गचे सुरू असलेल्या कामामधील दगड फोडण्यासाठी बोरवेल ब्लास्टिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. या बोरवेल ब्लास्टिंगमुळे मानसकोड येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. मानसकोड गावा लगत हायवेला असणाऱ्या घरांना मोठ्या तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते मात्र ठेकेदारांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे.
याबाबतचा मानसकोड ग्रामस्थ आक्रमक झाले असून लोकांच्या घरांना तडे जात असतील आणि त्यावरती लोकांची घरं पाडून महामार्ग होणार असेल तर त्याला 100% विरोध करणार असल्याचा खुलासा यावेळेस ग्रामस्थांनी केला आहे. आम्हाला महामार्ग हवा मात्र लोकांची घरे पाडून महामार्ग बनवण्याचे आदेश कोणत्याही ठेकेदार किंवा मंत्र्यांनी दिले नसल्याचे ठेकेदारांनी लक्षात घेतले पाहिजे मात्र मनमानी करुन लोकांना त्रास देऊन काम होणार असेल तर त्यांची तक्रार ना.नितीन गडकरी यांच्याकडे करणर असल्याचे सांगितले.
बोरवेल ब्लस्टिंगला विरोध करून सुद्धा संबंधित ठेकेदारांचे कामगार जाणून-बुजून लोकांना त्रास देण्याचे काम करत होते आणि एका वेळी 25 ते 30 पेक्षा जास्त होल मारून अडीचशे फुटापेक्षा खोल असे होल मारून या ठिकाणी बोरवेल ब्लास्टिंग केले जात होते. याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे.गावातील अनेक घरांना तडे सुद्धा गेले आहेत. ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवतला असुन त्यांची तक्रार केली गेली.
ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यांनी बोरवेल ब्लस्टिंग बंद पडली तर ठेकेदारचे काही चेले ही बोरवेल ब्लस्टिंग सूरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असुन बोरवेल ब्लस्टिंग झाल्यास पुढच्या नुकसाणास संबंधितांना सामोरे जावे लागेल असा ईशारा यावेळस देण्यात आला आहे.लवकरच मानसकोड किंजळेवाडी आणि इतर वाडीतील लोकांची मिटिंग होऊन यांची लेखी तक्रार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.