
शिर्के प्रशालेचे प्रशांत जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर
रत्नागिरी :शहरातील रा.भा. शिर्के प्रशालेचे सहाय्यक शिक्षक प्रशांत जाधव यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हयातील प्रतिष्ठीत शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा शिर्के प्रशाला रत्नागिरी येथे सहाय्यक इंग्रजी विषय शिक्षक व स्काऊट मास्टर म्हणून कार्यरत आहेत .
श्री पी.सी. जाधव यांनी आतापर्यंत १५ वर्षांच्या सेवा कालावधीत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. तसेच मायबाप बालसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून मागील अनेक वर्ष समाजसेवेत कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची देशव्यापी कार्यरत असलेल्या व आयुष मंत्रालय व बीसीसीआयसह जी -२० देशांची मान्यता असलेल्या एज्युकेशन अँण्ड स्पोर्टस प्रमोशन फाऊंडेशन च्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्काऊट चळवळीच्या माध्यमातून देखील त्यांच्या मागदर्शना खाली त्यांच्या पथकाने राजस्थान यथे राष्ट्रीय स्तरावरील जांबोरी येथे चमकदार कामगिरी केली आहे. ज्या १८ व्या जांबोरीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले होते. श्री पी.सी. जाधव यांनी सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभरात विविध प्रबोधनपर कार्यक्रम पथनाट्ये , सेहत की राखी ,शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबवित असतात यामध्ये एमबीबीएस फाऊंडेशनची त्यांना मदत होत असते . त्यांच्या कार्याची उचित दखल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या रजिस्टर्ड संस्थेने घेतली आहे . लवकरच मुंबई यथे १६ नोव्हें रोजी भव्य कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षकरत्न पुरस्काराची शिफारस त्यांनी मार्गदर्शन केलेल्या काही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केत्याचे एमबीबीएस फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. कविता सु.जाधव यांनी सांगितले. त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक विद्यार्थी सध्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत.श्री जाधव यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल इएसपी फाऊंडेशन महाराष्ट्र ( रत्नागिरी जिल्हा ) , सलाम मुंबई फाऊंडेशन, कास्ट्राईब शिक्षक संघटना , शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती शाखा रत्नागिरी , रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसह विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.