
खेड-दापोली मार्गावर ३० हजारांच्या साहित्याची चोरी
खेड : शहरातील मौजे खेड-दापोली मार्गावरील झमझम पार्क या इमारतीच्या दक्षिण बाजूस असलेल्या तळमजल्यावरील नवीन दुकानाच्या गाळ्यामध्ये ठेवलेल्या २९ हजार २४० रुपयांच्या वेल्डिंगच्या साहित्याची चोरी चोरट्याने केली आहे. हा प्रकार ३० ते ३१ ऑगस्टदरम्यान घडला.
चोरीस गेलेल्या वेल्डिंगच्या साहित्यामध्ये २० हजार रुपये किंमतीची हॅन्ड ड्रिलमशीन, ६ हजार ५०० रुपये किंमतीची मॅक्स कंपनीची वेल्डिंग मशिन, १३०० रुपये किंमतीचा अँगल ग्रैंडर व १४४० रुपये किंमतीची वेल्डिंग केबल यांचा समावेश आहे. या चोरीच्या घटनेची फिर्याद दानिश यासिन जुईकर यांनी दिल्यानुसार खेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.