
बसणी तंटामुक्त अध्यक्षपदी चंदन बसणकर यांची फेरनिवड
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील बसणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवार दि. ४ सप्टेंबर रोजी पार पडली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंदन रविंद्र बसणकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
२०२२-२३ मध्ये चंदन बसणकर यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. या दरम्यान त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची नोंद घेत त्यांची २०२३-२४ या वर्षाकरीता बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. चंदन बसणकर यांचा सामाजिक कार्यात व गावातील विकासासाठी नेहमी अग्रेसर असतात.
या वेळी सरपंच साक्षी झगडे, ग्रामसेवक अनुराधा सुर्वे, ग्रा.पंचायत सदस्य सुमित राणे, सुरेश उर्फ बबनराव शिंदे, लुंबिनी कदम, मानसी पाष्टे, समृध्दी मयेकर, गावच्या पोलिस पाटील प्रिया बंदरकर तसेच ग्रामस्थ माजी पोलिस उपनिरीक्षक श्री.विलास भोसले, प्रशांत बंदरकर, मोहन धांगडे,व्महेश नेवरेकर, अनंत मांडवकर, अनिल मयेकर, अरुण घुमे, सोनाली शिवलकर, संतोष पारकर, कदम गुरुजी, जितेंद्र राणे, गौतम कदम, संतोष नेवरेकर आदी उपस्थित होते. निवडीनंतर त्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.