
कोरे मार्गावर ५, ७ सप्टेंबरला मेगाब्लॉक
रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान मंगळवारी (ता. 5) तर कर्नाटक राज्यातील सेनापुरा ते ठोकुर दरम्यान गुरूवीरी (ता. 7) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या मालमत्ता देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या एकूण पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान 5 सप्टेंबरला दुपारी 12:20 ते सायंकाळी 3.20 असा तर सेनापुरा ते ठोकुरदरम्यान दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्या कोईमतूर-जबलपूर ही 4 सप्टेंबरला प्रवास सुरू होणारी एक्सप्रेस मडगाव ते चिपळूण दरम्यान सुमारे 90 मिनिटे रोखून ठेवली जाईल. सावंतवाडी रोड दिवा जंक्शन एक्सप्रेस ही ५ सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी सावंतवाडी ते चिपळूण दरम्यान 90 मिनिटे थांबवून ठेवली जाईल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस 5 सप्टेंबर रोजी कोलाड ते वीर दरम्यान सुमारे 30 मिनिटे थांबवून ठेवली जाईल. मंगळूर सेंट्रल ते मडगाव दरम्यान धावणारी मेमू एक्सप्रेसचा प्रवास ७ सप्टेंबर रोजी सुरू होतो. ती दुपारी 3.30 ऐवजी मेगा ब्लॉकमुळे सायंकाळी चार वाजून 45 मिनिटांनी सोडली जाणार आहे असून 75 मिनिटे विलंबाने धावेल. मंगळुरू ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस 7 सप्टेंबर रोजी एक तास उशिरा म्हणजे निर्धारित 4 वाजून 35 मिनिटांनी ऐवजी 5 वाजून 35 मिनिटांनी मुंबईसाठी सोडली जाईल.