
मद्यपी एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी: मद्यप्राशन करुन एसटी बस चालविणार्या ज्ञानेश दिलीप सुर्वे (वय ३१, रा. आदर्श वसाहत, कारवांचीवाडी) यांच्या विरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदिप पाटील हे बस स्थानकात उपस्थित असताना ज्ञानेश सुर्वे हा आपल्या ताब्यातील रत्नागिरी ते पावस जाणारी बस घेवून जात असताना तो मद्यप्रशन केलेल्या स्थितीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याची माहिती शहर पोलीसांना दिली. पोलीसांनी त्याला ताब्यात घेत वैद्यकिय तपासणी केली. यावेळी ज्ञानेशने मद्यप्रशन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीसांनी ज्ञानेश विरोधात गुन्हा दाखल केला आहे.