
कोकण नगर येथील माजी नगरसेवक मूसा काझी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद चे माजी नगरसेवक मूसा काझी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी नगरपरिषद च्या कोकण नगर प्रभागाचे माजी नगरसेवक असलेले मूसा काझी हे राजकीय जीवनाच्या सुरवाती पासून ना. उदय सामंत, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांचे कट्टर समर्थक ओळखले जातात. अनेक वर्ष सामाजिक, राजकीय, क्षेत्रात कार्यरत असलेले मूसा काझी यांचा मोठा मित्र परिवार जोडलेला आहे. कोरोना काळात त्यांनी प्रचंड कार्य केलेला आहे. त्यांच्या या सामाजिक, राजकीय , कारकिर्दीची दखल घेऊन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती पदी शिफारस केले होती. मूसा काझी यांच्या नियुक्ती मुळे सत्य प्रतची कामे करणे सोपे होणार असून कोकण नगर प्रभागातून त्यांच्या वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.