
एसटी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी :एसटी बसला मागून धडक देत चालकाला मारहाण करणार्या अज्ञात काळ्या रंगाच्या कार चालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसप्पा शंकर सपले (वय ४०, रा.शिरोळ, कोल्हापूर, चालक राजापूर डेपो) हे आपल्या ताब्यातील एसटी बस घेवून रत्नागिरीहून राजापूरकडे जात होते. शुक्रवारी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास बस टीआरपी येथून पुढे आल्यानंतर मागून आलेल्या काळ्या रंगाच्या कारने एसटी बसला मागून धडक दिली. बसला धडक बसल्याचे लक्षात येताच त्यांनी बस थांबविली. यावेळी कारमधून उतरलेल्या तरुणाने बसप्पा सपले यांना चालक केबिनमधून खाली उतरवत शिविगाळ करुन मारहाण केली. त्यांनतर धमकी देत तेथून निघून गेला.बसप्पा सपले यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीसांनी अज्ञात कार चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.