शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरेची मुंबई आत्महत्या
रत्नागिरी जिल्ह्यावर शोककळा;आत्महत्येचे कारण गुलदस्त्य
रत्नागिरी :शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, रत्नागिरीचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.मात्र असे काय झाले की, सुधीर मोरे यांनी आचानक आत्महत्येचा निर्णय याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
गुरुवारी सुधीर मोरे यांना एक फोन आला. त्यानंतर मी वैयक्तिक कामासाठी बाहेर चाललो आहे असे त्यांनी त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं. त्यांनी त्यांच्या सुरक्षारक्षकाला आपल्या बरोबर नेले नव्हते. तसेच गाडी न घेता ते रिक्षाने बाहेर पडले होते. त्यानंतर घाटकोपर आणि विद्याविहारच्या दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर त्यांनी आत्महत्या केली. रात्री साडेअकराच्या सुमारास ते रेल्वे रुळांवर झोपले होते. लोकल ट्रेनच्या मोटरमनला कुणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं लक्षात आले. त्याने वेग कमीही केला होता. मात्र काही उपयोग झाला नाही. लोकल त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत त्यांच्या मृतदेह छिन्नविचिछन अवस्थेत होते.
विक्रोळी पार्क साईट परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. सुधीर मोरे हे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक होते. सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुखही होते. सुधीर मोरे हे मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईट इथले शिवसेनेचे नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे माजी विभागप्रमुखही होते. त्यांची वहिनी देखील माजी नगरसेवक होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
सुधीर मोरे यांच्या निधनामुळे रत्नागिरी शिवसेनेवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह शिवसैनिकांनी मुंबईत धाव घेतली होती.