
बावनदी नदीपात्रात आढळला वृद्धाचा मृतदेह
रत्नागिरी:- बावनदी स्मशानभूमीजवळच्या नदीपात्रात बुधवारी वृद्धाचा मृतदेह आढळला आहे. तुकाराम लक्ष्मण ताम्हणकर (६०, कशेळीकोंड, ताम्हणकरवाडी, ता. रत्नागिरी) असे या वृद्धाचे नाव आहे.
ते सासूला बघायला वायंगणे नवालेवाडी येथे जातो, असे सांगून बाहेर पडले. त्यानंतर ते घरी गेले नाहीत. बुधवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह बावनदी स्मशानभूमीजवळ नदीपात्रात आढळला. या आकस्मिक मृत्यूची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात केली आहे