
शालेय कुस्ती स्पधेत आदर्श हायस्कूल कुरतडेचे सुयश
रत्नागिरी:- रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत आदर्श हायस्कूल कुरतडेच्या विद्यार्थ्यांनी धवल यश मिळवले.
14 वर्षाखालील स्पर्धेत श्रेयश आग्रे 44kg प्रथम क्रमांक, आकाश जोगळे 38kg प्रथम क्रमांक तसेच 17 वर्षा खालील वेगवेगळ्या गटामध्ये अक्षय शिंदे -51 kg प्रथम क्रमांक, सुदेश रेवाळे 44 kg द्वितीय क्रमांक, सार्थक फुटक 71kg प्रथम क्रमांक हे मल्ल विजयी झाले. या सर्व विजयी मल्लांना कुरतडे हायस्कूलचे मानसिंग कदम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुरतडे हायस्कूलचे मुख्याध्यापक मांडवकर सर यांनी ही या प्रसंगी प्रोत्साहन दिले.
सदर स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी चे होम डिवायएसपी सुदाम माने यांच्या हस्ते झाले. समन्वयक म्हणून सुखील पटेल यांनी काम पाहीले. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद जोशी यांनी भेट दिली. कुस्ती पंच म्हणून मानसिंग कदम व मारुती गलंडे यांनी काम पाहीले. या स्पर्धला रत्नागिरी एक्सप्रेसचे आनंद तापेकर यांची ही उपस्थिती होती.