
गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल गुरुकुल रत्नागिरी चा पोहणे उपक्रम संपन्न
73 विद्यार्थ्याने घेतले पोहण्याचे प्रशिक्षण
रत्नागिरी :भारत शिक्षण मंडळ संचलित पटवर्धन हायस्कूलच्या गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल मध्ये दरवर्षी पोहणे हा उपक्रम रत्नागिरी शहरातील शासकीय जलतरण तलावामध्ये आयोजित केला जातो यावर्षी या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते नववी या वर्गातील एकूण 73 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हा उपक्रम एक महिने चालला त्यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तम पोहू लागलेत गुरुकुलचे प्रबंधक श्री मनोज जाधव सर व ज्येष्ठ शिक्षक दिनेश मोहिते यांनी मुलांना पोहायला शिकविले तसेच या उपक्रमासाठी सर्व अध्यापकांचे तसेच पालकांचे सहकार्य लाभले या पोहणे उपक्रमाला शासकीय जलतरण येथे प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे उपमुख्याध्यापक वसंत आरडे संस्था अध्यक्ष नंदकुमार साळवी सदस्य विनायक हातखंबकर यांनी भेट दिली या उपक्रमामध्ये दरवर्षी विद्यार्थी सहभागी होत असतात त्यामुळे या उपक्रमाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे गुरुकुल हा उपक्रम बारा तासाचा असून यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात त्यामध्ये ट्रेकिंग, दहीहंडी, भात लावणी, मातृभूमी परिचय शिबिर ,चालणे, व्यायाम, सूर्यनमस्कार ,योगा, उपासना विविध प्रदर्शन व विक्री, गणेश मूर्ती तयार करणे इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवले जातात त्यामुळे देशाला एक अष्टपैलू दर्जाचा नागरिक मिळतो