
तीन वर्षाच्या गोंडस बाळाला शोधून दिली आई
रत्नागिरी :जिल्हा शासकीय रुग्णालयात अनेक ठिकाणांहून अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात,सर्वात प्रथम ते येतात अपघात विभागात जेथे रुग्ण मदत केंद्र आहे.एक गरोदर माता आपल्या तीन वर्षाच्या गोंडस मुलाला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी साठी आली होती.तपासणी करुन झाल्यावर औषध आणण्यासाठी ती औषध विभागाजवळ रांगेत उभी राहिली असता चुकून तिच्या हातातून हा गोंडस बाळ तिथून पुढे गेला,औषधे घेतल्यानंतर त्या गरोदर महिलेच्या लक्षात आले की,आपले बाळ कुठंतरी हरवलं आहे,हंबरडा फोडत ती संपूर्ण हॉस्पिटल फिरली मात्र हताश होवुन ती संपर्क रुग्ण मदत केंद्र येथे आली,या गंभीर घटनेची त्वरित दखल घेत संपर्क युनिक फाउंडेशनच्या मदत केंद्राच्या कॊऑर्डिनेटर निकीता कांबळे यांनी सर्व सिक्युरिटी यांना बोलावले व परिस्थिती सांगितली चहू बाजूंनी ते गार्ड शोधत राहिले,मात्र ते बाळ सापडले नाही.अखेर निकीता कांबळे यांनी हुशारीने हॉस्पिटलच्या गच्चीकडे धाव घेतली आणि निःश्वास टाकला…तो बाळ तेथून खाली पहात होता…लगेच त्या बाळाला कडेवर घेऊन त्या महिलेच्या स्वाधीन केले… त्या मायेच्या अंतःकरणाने नक्कीच दुवा मिळाला असेल… उपस्थित सिव्हिल चे कर्मचारी आणि आलेले रुग्ण व इतर नागरिक यांनी निकीता कांबळे मॅडम चे कौतुक करुन संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला धन्यवाद दिले…..