
शिवछत्रपती पुरस्कारावर रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांची मोहोर
रत्नागिरी:- जिल्ह्यातील याशिका शिंदे, आरती कांबळे, प्रणव देसाई आणि अपेक्षा सुतार या खेळाडूंना क्रीडा जगतातील मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गाैरविण्यात आले. एकाचवेळी चाैघांनी या पुरस्कारावर आपली माेहाेर उमटवली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा क्रीडा क्षेत्रातील मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पुणे येथील बालेवाडीत आयाेजित केलेल्या या पुरस्कार साेहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती हाेती. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील चाैघांनी या क्रीडा पुरस्कारावर आपली माेहाेर उमटवली. यामध्ये रत्नागिरी शहरातील आरती कांबळे आणि अपेक्षा सुतार या खाे-खाे पटूंचा समावेश आहे.
त्याचबराेबर चिपळूण तालुक्यातील कादवड गावातील याशिका शिंदे हिने रायफल शुटींग क्रीडा प्रकारात तर संगमेश्वर तालुक्यातील काेंढ्ये येथील प्रणव देसाई याला दिव्यांग मैदानी स्पर्धेतील कामगिरीवर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रत्नागिरीतील चारही खेळाडूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जाेरावर पुरस्कारावर आपले नाव काेरले आहे. त्यांचे नाव रत्नागिरीच्या इतिहासातील पानावर काेरले गेले आहे.