
डंपरला धडक देत अपघात केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा
रत्नागिरी:- बेदरकारपणे ट्रक चालवून समोरून येणाऱ्या डंपरला धडक देत अपघात केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना जयगड ते निवळी रस्त्यावर चाफे तिठ्याचे पुढील बाजूस २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.१५ वा. घडली होती.
नामदेव लिंबाजी वावरे (वय २६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तो आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावरुन जात होता. त्याच सुमारास डंपर चालक गोटीराम राजेंद्र रोकडे (३०) हा आपल्या ताब्याती डंपर घेउन समोरून येत होता. ही दोन्ही वाहने चाफे तिठ्याचे पुढील बाजुस आली असता ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सूटला आणि त्याने समोरून येणाऱ्या डंपरला धडक देत अपघात केला. यात दोन्ही चालकांना दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे. प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.