
खंडाळा येथील दुचाकीमधील बॅटर्यांची चोरी
रत्नागिरी :गॅरेजच्या बाहेर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दुचाकीमधील पेट्रोल, बॅटरी व फॉग लॅम्प काढून घेण्याची घटना खंडाळा सुर्वेनगर (ता. रत्नागिरी) येथे २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:३० ते २ या वेळेत घडली.
खंडाळा सुर्वेनगर येथे कृष्णा पटेल यांचे गॅरेज आहे. या गॅरेजसमोरील मोकळ्या जागेत दुरुस्तीसाठीच्या दुचाकी उभ्या करून ठेवलेल्या असतात. दि. २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास यापैकी एका दुचाकीमधील पेट्रोल, बॅटरी आणि फॉग लॅम्पची चोरी झाल्याचे पटेल यांच्या शनिवारी निदर्शनात आल्याने त्यांनी याप्रकरणी २७ रोजी सायंकाळी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात २५३५ रुपये किमतीची बॅटरी १००० रुपये किमतीचे फॉग लॅम्प आणि पेट्रोलची चोरी याली आहे.