
वाटदसह खंडाळा येथे अवैध जुगारावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद व खंडाळा मच्छीमार्केट आणि गणेशवाडी येथे अवैध जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतेश प्रशांत पारकर (२९, रा. उंडी, रत्नागिरी ) आणि लिलाधर गंगाधर लिंगायत (४६, मूळ रा. जोशी पाळंद, सध्या रा. जयगड) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.
सदर कारवाई शनिवारी (ता. २६) सकाळी साडेनऊ ते दुपारी दोनच्या सुमारास केली. शनिवारी सकाळी आणि दुपारी ते वाटद खंडाळा मच्छीमार्केट आणि गणेशवाडी येथून गस्त घालत असताना संशयित हे तेथील नागरिकांकडून पैसे स्वीकारुन कल्याण मटका जुगार चालवत असल्याचे निदर्शनास आले त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराच्या साहित्यासह ९०२ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला