
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्या प्रकरणी संशयिताचा जामीन मंजूर
खेड:- दापोली येथील पिडीत अल्पवयीन बालिके सोबत विवाह करीत तिच्यावर जबरदस्ती केल्यामुळे ती गर्भवती राहीली व तीने मुलाला जन्म दिला, तीने दिलेल्या तक्रारीनुसार दापोली पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानुसार भा.दं.वि कलम ३७६ (२) (प), ३७६ (३), २०२, ३४, बालकांचे लौगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, २१, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ नुसार संशयत आरोपी सुभाष निकम यांच्या विरूध्द अशी गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल करण्यात आली. संशयित आरोपी सुभाष निकम याने ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्याशी विवाह केला व पिडीत बालिकेसोबत जबरदस्ती शारिरीक संबंध केले. पिडीत मुलगी हि गरोदर राहीली व तीने मुलाला जन्म दिला, तसेच संशयित आरोपी यांनी केलेल्या जबरदस्ती शारिरीक संबंध व विवाहम मुळे पिडीत मुलगी हिने संशयित आरोपी सुभाष निकम, तारामती निकम व माधुरी वाघमारे यांच्या विरूध्द दापोली पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली व आरोपीस अटक करण्यात आली. सदर आरोपी याच्यावतीने खेड येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालय येथे जाम न अर्ज दाखल करण्यात आला. सदर आरोपीच्यावतीने ॲड. स्वरूप सुबोध थरवळ यांनी जामीन अर्जवर युक्तीवाद केला.