
आस्था मध्ये दिव्यांग मतदार नोंदणी शिबिर संपन्न
रत्नागिरी :आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी,मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय रत्नागिरी, तहसीलदार कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन आस्था सोशल फाउंडेशन ,छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दिनांक 25 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. मा. उप विभागीय अधिकारी जीवन देसाई व मा.तहसीलदार रत्नागिरी राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर संपन्न झाले . मा.तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मा.प्रांत अधिकारी .जीवन देसाई यांनी सुलभ निवडणुका अंतर्गत दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबद्दल माहिती दिली व सर्व दिव्यांगांनी याचा लाभ घेऊन मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.या शिबिरात 25 ते 30 दिव्यांगानी लाभ घेतला.या प्रसंगी आस्थाच्या खजिनदार कु. साक्षी चाळके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तसेच सूत्र संचालन केले. शिबीर आयोजना साठी तहसील कार्यालयाचे परिमल डोर्लेकर ,BLO गायकवाड व आस्थाच्या कु. मयुरी जाधव सह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला जिल्हा सुलभ निवडणूक सनियंत्रण समितीच्या सदस्या श्रीम.पल्लवी शर्मिला माने या देखील उपस्थित होत्या.
