नारायण पावरी यांची विशेष कार्यकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
रत्नागिरी :जांभारी येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी असलेले श्री नारायण सत्यवान पावरी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे प्रशालेत श्री पावरी यांचा शाल,श्रीफळ व बुके देवुन मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांनी सत्कार केला. श्री पावरी सर हे सेवानिवृत्त होवूनही शालेय कामासाठी तसेच सामाजिक कामासाठी नेहमीच पुढे असतात.त्यांच्या निस्वार्थी , सेवाभावी व प्रामाणिकपणे करीत असलेल्या कामाचा सतत हेवा वाटतो असे गौरवोद्गार श्री कोळेकर यांनी काढले.यावेळी सौ.ऋतुजा जाधव,सौ.सुवर्णा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी श्री पावरी सरांनी शाळा,संस्था व स्टाफचे नेहमीच प्रोत्साहन मिळाले.यापुढेही आपण सामाजिक बांधिलकी समजून कार्यरत राहणार आहे असे ते म्हणाले.यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी रुमान पारेख, श्री अविनाश केदारी,श्रीमती स्मिता पाटील, श्री राजेश पोवार, सौ.गंधेरे,अकबर पागरकर,राजेंद्र कदम,नौशाद मुल्ला आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विनोद पेढे यांनी केले.