
रत्नागिरी कॉंग्रेसतर्फे जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक सुधीर घायरकर यांचे अभिनंदन
रत्नागिरी :रत्नागिरी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष व प्रभारी हारीस शेकासन व शहराध्यक्ष रमेश शाहा यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक श्री सुधीर घायरकर यांची भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी शहरातील प्रमुख वाहतूक समस्यांवर चर्चा झाली.यामध्ये प्रामुख्यांने जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, शहराध्यक्ष रमेश शाहा व तालुकाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग शाहरुख वागले यांनी काही विषय जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यावर सुधिर घायरकर यांनी सुचनांचे स्वागत करुन जनतेला पोलिस चांगली सेवा देतील,असे आश्वासन दिले.यावेळी शहर उपाध्यक्ष रफिक मुल्लाजी व सरचिटणीस पत्रकार रहिम दलाल उपस्थित होते.