
मंगला एक्सप्रेसमधून
१४ हजारांचा मुद्देमाल लंपास
खेड :- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मंगला एक्सप्रेस गाडीमधून एका महिलेची अज्ञात व्यक्तीने पर्स चोरून १४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणी सुरभी रामकेशव हलतकार , राहणार जबलपूर , मध्यप्रदेश यांनी येथील पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे . त्या २६ जुलै रोजी मंगला एक्सप्रेस गाडीने प्रवास करत होत्या . गाडी नंबर १२६१८ मंगला लक्ष्यद्वीप एक्सप्रेस या गाडीने कोच नंबर बी / ४ सीट / २६ मध्ये त्या झोपून प्रवास करीत असताना प्रवासादरम्यान त्यांच्या डोक्याजवळ ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेऊन चोरुन नेली . या पर्समध्ये १० हजार रुपये किंमतीचा पोको कंपनीचा मोबाईल व ४ हजार रोख रक्कम असा मुद्देमाल होता .