
कोकण रेल्वेच्या काही गाड्यांत जादा कोच
रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. आता तर गणेशोत्सवाचे दिवस आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीही मोठी आहे. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्यांत तात्पुरत्या स्वरूपात कोच वाढविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे याचा लाभ गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना होणार आहे.
हापा-मडगाव (२२९०८) एक्स्प्रेसमध्ये २३ ऑगस्टला एक अतिरिक्त कोच वाढविला आहे. मडगाव-हापा (२२९०७) एक्स्प्रेसमध्ये २५ ऑगस्टला एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे. पोरबंदर-कोचुवेली (२०९१०) आणि कोचुवेली ते पोरबंदर (२०९०९) या एक्स्प्रेसमध्ये अनुक्रमे २४ आणि २७ ऑगस्टला एक अतिरिक्त कोच जोडला जाणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.