रत्नागिरी शहरात उद्या जनजागृतीपर रॅलीचे आयोजन
रत्नागिरी :रत्नागिरी शहरात दि. २३/०८/२३ रोजी सकाळी १०.०० वा “वाहतुकीचे नियमन”* बाबत विधी व न्याय विभाग रत्नागिरी व जिल्हा वाहतूक शाखा रत्नागिरी तसेच प्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरी यांच्या सयुक्त विद्यमाने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅली ची सुरुवात मा. सत्र न्यायालय, रत्नागिरी येथून होऊन पुढे जयस्तंभ – मारुती मंदिर – चर्मालय – साळवी स्टॉप व परत मारुती मंदिर – जिल्हाधिकारी कार्यालय गेट, अश्या स्वरूपाचा मार्ग असणार आहे.
या कार्यक्रमाकरिता मा. मुख्य न्यायाधीश सत्र न्यायालय रत्नागिरी, मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी तसेच मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.