
सैतवडे येथील सामाजिक कार्यकर्ते अ.शकुर इब्राहिम चिलवान यांचे निधन
रत्नागिरी:- मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे माजी जनरल सेक्रेटरी अ.शकुर इब्राहिम चिलवान (वय ७८) यांचे हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री त्यांना हद्यविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र आज सोमवारी सकाळी त्यांचे देहावसान झाले.
निधनाची बातमी समजताच सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल मधील अध्यापनाचे काम थांबवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. जवळपास १४ वर्षे त्यांनी संस्थेचे जनरल सेक्रेटरी पद भुषवले. सन २००७ ते २०२१ या कालावधीत त्यांनी संस्था व शाळेच्या चौफेर प्रगतीसाठी योगदान दिले.या कालावधीत शाळेला स्कुल बस घेतली.संपुर्ण शाळा दुरूस्ती चे काम केले.शाळेबरोबरच गावातील प्रत्येक सामाजिक कामातील त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.सन १९६३-१९६४ या वर्षातील इयत्ता दहावीत च्या बँचमध्ये ते प्रथम आले होते.अत्यंत पारदर्शक कामकाजामुळे ते सर्वपरिचित होते.
शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याची त्यांची खासियत होती.सतत शाळेच्या प्रगतीबाबत ते आग्रही होते.अनेक वर्षे परदेशात राहिल्याने ते एक शिस्तप्रिय होते.सर्व धर्मसमभावाचा आग्रह धरणारे होते.शाळेच्या व संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध केला.आपल्या जिवनातील अमुल्य वेळ शाळेसाठी दिला.सैतवडे गावातही अनेकांच्या अडी अडचणीत ते धावून जात.त्यांच्या अचानक जाण्यामुळे गावाची ,शाळा,संस्थेची फार मोठी हाणी झाली आहे.
त्यांच्या निधनाने सैतवडे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . त्यांचा दफनविधी सैतवडे येथे संध्याकाळी ५:३० वा . करण्यात येणार आहे.