
19 ऑगस्टला मोफत योग शिबिर संपन्न
रत्नागिरी : रत्नागिरीतील लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, दैवज्ञ हितवर्धक समाज रत्नागिरी, निरामय योगा रत्नागिरी यांचे मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला प्रमोद खेडेकर,दत्तप्रसाद केळुसकर, गणेश धुरी फईजअली फडनाईक संतोष खेडेकर सह शंभरहून अधिक साधकांनी हजेरी लावली ,शनिवार दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 6.0 ते 8.0 या वेळात दैवज्ञ भवन सभागृह नाचणे रोड येथे हे योग शिबिर संपन्न झाले.सर्वांसाठी मोफत असलेल्या योग शिबिरामध्ये पतंजली योगपिठाचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त ज्येष्ठ योग गुरु श्री. वीरू स्वामी यांनी योग आणि प्राणायाम याबाबत प्रात्यक्षिकांसह खूप सुंदर असे मार्गदर्शन केले.
यामध्ये रोगानुसार योगमार्गदर्शन, फिजिओथेरपी आणि ॲक्युप्रेशर मार्गदर्शन देखील केले . तसेच कंबरदुखी,गुडघेदुखी, रक्तदाब, शुगर, थायरॉईड, स्त्रियांचे आजार अशा अनेक रोगांवर योगाद्वारे उपचार आणि मार्गदर्शन केले . मुख्यबाब म्हणजे शिबिरात भाग घेतलेल्यांचे एक ते दोन किलो वजन अवघ्या दोन तासात कमी झाले. त्यासाठी योगापूर्वी आणि योगानंतर वजन तपासून त्याची खात्री करून दिली
निरामयचे अनेक नियमित योग साधकांनी आपले योगा चे अनुभव शेअर केले,त्यामधे अनेकांची 10 ते 15 वर्षे घेत असलेले बीपी, शुगर, हार्ट,मणक्याचे विकार असे अनेक असाध्य आजारांची औषध बंद झाले आहेत.आणि आत्ता निरामय योगा जॉईन केल्यापासून कोणीही एकही कसलीही गोळी खात नाही.
शेवटी योग गुरु विरू स्वामी यांनी सगळ्याला नियमित योग साधना करून निरोगी राहण्याचा मोलाचा सल्ला दिला.
