
खवटी येथील बीएसएनएलच्या टॉवरमधील ६० हजार रुपयांच्या बॅटरीची चोरी
खेड:- तालुक्यातील खवटी येथील बी. एस. एन. एल. च्या टॉवरच्या रूममध्ये ठेवलेली ६० हजार रुपये किंमतीची जुन्या बंद स्थितीत असलेली २४ सेलची बॅटरी चोरीस गेल्याची घटना ८ ऑगस्ट दुपारी ३ ते १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजताच्या मुदतीत घडली आहे.
ही बॅटरी एनईटी कंपनीची ६०० ए. एच. अम्पियर अवर कॅपेसिटीची बॅटरी सुमारे ६० हजार रुपये किंमतीची कोणीतरी अज्ञात इसमाने बी. एस. एन. एल. टॉवर रूमच्या पाठीमागील खिडकीची काच फोडून त्यावाटे आत प्रवेश करून चोरुन नेली, म्हणून अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.