
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवार 12 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वा.मंगलोर सीएसटी एक्सप्रेसमध्ये उडपी रेल्वे स्टेशन ते रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,12 ऑगस्ट रोजी ते मंगलोर सीएसटी एक्सप्रेसने प्रवास करत होते.प्रवासादरम्यान ते झोपी गेले असताना अज्ञाताने त्यांच्या झोपेचा फायदा उठवत चार्जिंगला लावलेला त्यांचा 13 हजार रुपयांचा मोबाईल लांबवला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.