
गोवा बनावटीची दारु विक्री करताना एकाला अटक
खेड :खेड तालुक्यातील धामणदेवी गावातील पर्शुराम स्टॉप येथे गोवा बनावटीची दारु विक्री करताना प्रकाश सिताराम हुमणे (३५) याला अटक करण्यात आली आहे. हि घटना स्वातंत्र्यदिनी रात्री ९:४१ च्या सुमारास घडली आहे.
धामणदेवी हद्दीतील पर्शुराम बस थांब्यावर ३५ वर्षीय प्रकाश सिताराम हुमणे हा गोवा बनावट दारु विक्री करीत होता. याची माहिती पोलीस विशाल जयेश धाडवे यांनी पर्शुराम दुर्गवाडी येथे धाड टाकून गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्यांवर गोल्डन ब्ल्यू फाईन व्हिस्की ७२८ रुपये किंमतीची १८० मिली मापाच्या २८ सिलबंद बाटल्या व एक निळ्या पिवळ्या रंगाची प्लास्टिकची बादली असा एकूण ७४८ रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करुन त्याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २३९/२०२२ प्रमाणे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये अटक करुन कारवाई आहे.