
संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ने केला स्वातंत्र्य दिन आगळावेगळा उपक्रम
रत्नागिरी :संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना समाजातील काही घटक असा उत्साह उपभोगण्यास नाईलाजास्तव मुकतात, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेच्या वतीने 76 वा स्वातंत्र्यदिन सोहळा दिव्यांग मुलांसोबत साजरा करुन समाजात एक आदर्श निर्माण करुन दिला.
मुलं आपल्या पालकांना अशा या दिवशी अनेक हट्ट पुरविण्यास सांगतात,पालक ही अशा आनंदी वातावरणात त्या पूर्ण करतात,मात्र समाजात अशीही काही मुलं असतात, त्यांना असा हट्ट नाही करता येत,मनात असूनही हा आनंद उपभोगता येत नाही हीच गोष्ट मनात ठेवून संपर्क युनिक फाउंडेशन चे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी आपल्या सर्व टीमला यादिवशी रत्नागिरी शहरातील आशादीप या दिव्यांग [ मतिमंद ] मुलांच्या केंद्रात नेले.
या मुलांसोबत सर्वजण बोलू लागले, ज्यावेळी मुलांसमोर देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले त्यावेळी या मुलांच्या मनातील देशाभिमान जागृत झाला आणि ही मुलं ही देहभान विसरून नाचू लागली,काही मुलांनी आपापल्या परीने भाषणे ही केली,मुलांना खावू देण्यात आले,यावेळी शकील गवाणकर यांचे समवेत संस्थेचे कांचन मालगुंडकर, युसुफ शिरगांवकर,नाझीम मजगावकर,जमीर खलफे,जया डावर, निकीता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.अशा प्रकारचा आगळावेगळा उपक्रम संस्थेच्या वतीने आपल्या संस्थेतील मुलांकरिता राबविल्याबद्दल आशादीप चे दिलीप रेडकर यांनी समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले.