सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन ;
दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी :- शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल शेजारी आणि साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव शेजारी या दोन सार्वजनिक ठिकणी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० ते ९ वाजता या कालावधीत करण्यात आली . अमरेश पांडुरंग धातकर ( ३२ , रा . रहाटाघर , रत्नागिरी ) , अमोल मारुती कदम ( ३६ , रा . साळवी स्टॉप संभाजीनगर , रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत . रविवारी रात्री शहर पोलिस शहरात गस्त घालत असताना त्यांना या दोन्ही हे दोन्ही संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत आसताना आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली .