पोलीस नियंत्रण कक्ष आणि सायबर पोलीस ठाणे
नुतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी, : पोलीस परेड ग्राऊंड येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळयानंतर जिल्हा पोलीस दलामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘सायबर गुन्हयापासून मुलींना करा मुक्त’ या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच सायबर पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष व शस्त्रागार नुतन इमारतीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाला जिल्हा नियोजन मधून दिलेल्या 4 वाहनांचे लोकार्पणही करण्यात आले.
