कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी:- कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सव अतंर्गत दि.१५ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८.१५ वा ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न ,प्रमुख पाहुणे मिलींद किर माजी नगराध्यक्ष यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारत सावंत, सुजाता भालेकर, गुणवंत कामगार व कार्यक्रम अध्यक्ष रमाकांत पांचाळ, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, निधी सावंत, रुतुजा पारटे , समीर शिंदे कामगार याची उपस्थिती लाभली.
पाहुणे मिलिंद किर यांनी केंद्राचे कार्य उपक्रम यांचे कौतुक केले. सहकार्य करण्याचे आश्वासन ही दिले.
संस्कृती शिंदे केंद्र महिला कल्याण सहाय्यिका यांनी स्वागत व आभार मानले. नागवेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.