रत्नागिरीत मराठा मंडळातर्फे मोफत योग शिबीर संपन्न
रत्नागिरी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरीमध्ये मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. मराठा मंडळातर्फे आयोजित केलेल्या योग शिबिरामध्ये पतंजली योगपिठाचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त ज्येष्ठ योग गुरु श्री. वीरू स्वामी यांनी प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केले. या योग शिबिराला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कंबरदुखी,गुडघेदुखी, रक्तदाब, शुगर, थायरॉईड, स्त्रियांचे आजार यासह अनेक आजारांवरती उपयुक्त अशी योगाची प्रात्यक्षिकं दाखवली गेली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीतील मराठा मंडळातर्फे मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5:30 ते 7:30 या वेळात मराठा भवन सभागृह माळनाका येथे हे योग शिबिर संपन्न झालं . विशेष म्हणजे हे शिबीर सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आलं होतं. यामध्ये रोगानुसार योगमार्गदर्शन, फिजिओथेरपी आणि ॲक्युप्रेशर याचं मार्गदर्शन देखील करण्यात आलं. तसेच कंबरदुखी,गुडघेदुखी, रक्तदाब, शुगर, थायरॉईड, स्त्रियांचे आजार अशा अनेक रोगांवर योगाद्वारे उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आलं.
