ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ इंडिया सन्मान पुणे येथील शानदार समारंभात अँड. दीपक पटवर्धन यांना प्रदान
रत्नागिरी:कॉसमॉस बँक आणि ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध मान्यवरांना सन्मानित केले सहकार क्षेत्रात प्रदिर्घ उत्तम कामगिरी बद्दल हा सन्मान अँड. दीपक पटवर्धन यांना पुणे विद्यानगरी येथे शानदार समारंभात प्रदान करण्यात आला राज्यउत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते श्री मिलिंद काळे चेअरमन कॉसमॉस बँक गौतम कोतवाल अध्यक्ष ग्रीन वर्ल्ड व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
स्वरूपानंद पत संस्थेचे नेतृत्व करत प्रदीर्घ काळ केलेली सातत्यपूर्ण प्रगती सहकाराची ताकद ओळखत केलेली भांडवल निर्मिती विश्वासार्हते चा मानदंड, रत्नागिरी जिल्हा मध्य बँके मध्ये दीर्घ काळ संचालक म्हणून केलेले काम राज्य पत संस्था फेडरेशन या संघ संस्थेचे कार्याध्यक्ष पदा पर्यंत मारलेली धडक महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात 30 वर्ष केलेले रचनात्मक काम गोवा शिपयार्ड कंपनी वर केंद्र शासन सवरक्षण खात्याने केलेली इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून नियुक्ती या सर्वाचा सचित्र आढावा दर्शक चित्रफीत दाखवत पटवर्धन यांना सन्मानित केले गेले.
मला प्राप्त झालेला हा पहिला वहिला सन्मान माझे कुटुंबीय तसेच महाराष्ट्रातील पत संस्था चळवळीला समर्पित करतो असे पटवर्धन म्हणाले.