सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वा. करण्यात आली.
सादिक आदम सोलकर (५६, रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशतिय आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल पवन पांगरीकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रौढ जयगड बसस्टॉप समोर सार्वजकिन रस्त्यावर संशयित हा दारू पित असताना आढळून आला.