
भोके रेल्वेस्टेशन दरम्यानच्या ट्रॅकवर देवळे येथील वृद्धाचा सापडला मृतदेह
रत्नागिरी :करबुडे भोगदा ते भोके रेल्वेस्टेशन दरम्यानच्या ट्रॅकवर वृद्धाचा छीन्न – वीछीन्न अवस्थेत मृतदेह सापडून आला. ही घटना शुक्रवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा. उघडकीस आली.
अनंत लक्ष्मण तोडकरी (72,रा.देवळे वाणीवाडी, रत्नागिरी ) असे रेल्वेची धडक बसून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत ट्रॅकमन ने ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानुसार,रात्रपाळीची ड्युटी करून शुक्रवारी सकाळी ते भोके रेल्वेस्टेशन ट्रॅकवरून चालत घरी जात होते. त्यावेळी त्यांना छीन्न – वीछीन्न अवस्थेत मृतदेह दिसून आला. मृतदेहाच्या बाजूला पडलेल्या मोबाईलद्वारे त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला असता मृताचे नाव समजून ओळख पटली.याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.