
मराठा मंडळातर्फे मोफत योग शिबिराचे आयोजन
रत्नागिरी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीतील मराठा मंडळातर्फे मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5:30 ते 7:30 या वेळात मराठा भवन सभागृह माळनाका येथे हे योग शिबिर संपन्न होईल. सर्वांसाठी मोफत असलेल्या योग शिबिरामध्ये पतंजली योगपिठाचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त ज्येष्ठ योग गुरु श्री. वीरू स्वामी योग आणि प्राणायाम याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये रोगानुसार योगमार्गदर्शन, फिजिओथेरपी आणि ॲक्युप्रेशर मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. तसेच कंबरदुखी,गुडघेदुखी, रक्तदाब, शुगर, थायरॉईड, स्त्रियांचे आजार अशा अनेक रोगांवर योगाद्वारे उपचार आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. मुख्यबाब म्हणजे तुमचे एक ते दोन किलो वजन अवघ्या दोन तासात कमी होणार आहे. त्यासाठी योगापूर्वी आणि योगानंतर तुमचे वजन तपासून त्याची खात्री करून दिली जाणार आहे. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीने स्वतः करता योगा मॅट किंवा सतरंजी, पाणी, नॅपकिन सोबत आणावे. शिबिरामध्ये सहभागी होताना शक्यतो सैल सुती कपडे घालावे. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीने नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर हजर राहावे. तसेच ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींनी 15 मिनिटे अगोदर हजर रहावे आणि मोफत योग शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन मराठा मंडळातर्फे करण्यात आले आहे.