
रामदास आठवले ३ सप्टेंबर रोजी चिपळूणात
चिपळूण :- केंद्रीय मंत्री रामदास आठवले ३ सप्टेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिय ( आठवले गट ) महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी दिली .
या दौऱ्यात मंत्री आठवले यशोधननगर येथील ॲड . दयानंद मोहिते फाउंडेशन स्मारकाची पाहणी करतील . त्यानंतर कापसाळ येथील स्व . लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे . याबाबत रिपाइं महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी सांगितले की , दयानंद मोहिते फाउंडेशनच्य इमारतीच्या भूमिपूजनाला आठवले सात वर्षांपूर्वी चिपळुणात आले होते येथे अत्याधुनिक डायलेसिस मशिन एमआरआय मशिन , सोनोग्राफी लायब्ररी जनतेच्या सुविधांसाठी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहेत. इमारत डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल . चिपळूणला आकाशवाणी प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे , ते पुन्हा सुर करण्यात यावे , अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात येणार आहे. चिपळूणच्या विकासकामांसाठीही भरघोस निधी ते उपलब्ध करून देतील असे मोहिते यांनी सांगितले .