
सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर निवड
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावाचे सुपुत्र,सामाजिक कार्यकर्ते,नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष,पत्रकार,शासनाच्या ग्राहक सरक्षण समितीवर अशासकीय सदस्य, रमजान गोलंदाज यांची पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या शिफारसी नुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी विशेष कार्यकारी अधिकारी यां पदावर नुकतीच निवड करण्यात आली असुन त्यांच्या या झालेल्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड करण्यात आल्याने अनेकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.
गेल्या अनेक वर्ष सामाजिक कार्यात काम करत असणारे रमजान गोलंदाज हे तळागाळातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत होते. सामाजिक कामातून अनेक लोकांशी ते जोडले गेले असून इतरांची समस्या ही स्वतःची समस्या समजून त्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. परिसरातील अनेक विषय त्यांनी मार्गी लावले असून समाजामध्ये त्यांचं चांगलंच वजन आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक धर्मातील आणि प्रत्येक व्यक्तीला आपला व्यक्ती म्हणून त्यांना मदत करण्याच्या भावनेतून रमजान गोलंदाज समाजामध्ये वावरत आहेत. त्यांनी आपली मजबूत कमान उभी केली असल्याचे बोलले जात आहे.ते विविध सामाजिक कार्याची माहिती आणि सामाजिक काम करत असतात तालुक्यात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासनात ही त्यांचे चांगले वजन आहे.त्यांना दिलेल्या पदाचा फायदा सर्वसामान्य माणसाला होणार आहे.