
दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन आरडाओरडा करत धिंगाणा करणार्या सहा जणांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. ७ ऑगस्ट) सायंकाळी घडली.
आकाश सुनील गावंडे (२६), सुमित किशोर राऊत (२४), अंकुश राजेंद्र मोडक (२२), आशुतोष प्रदीप गुंजाळकर (२२), रोहन पांडुरंग शिरसोले (२५), मंदार गजानन शिरसाले (२३, सर्व अमरावती, सध्या चिंच नाका, चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरील सवतसडा धबधबा आणि रस्त्यापासून जवळपास १०० मीटर अंतरावर पेढे-परशुराम मालवाडी परिसरात हे सहा जण दारू पिऊन आरडाओरडा करत होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.