
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत ३ दिवसाच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर
रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत हे ३ दिवसाच्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून यावेळेस त्यांनी भारतातील दक्षिण कोरियातील राजदूत सन्मा.अमित कुमार यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी त्यांना निमंत्रित केले आहे. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढावी आणि येथील स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत यांनी एक पाऊल पुढे येऊन परदेशातील गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या भेटीगाठी घेऊन महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये भर पाडण्यासाठी यावेळेस निमंत्रण देण्यात आले आहे. उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत परदेश दौऱ्यावर असताना दक्षिण कोरियातील राजदूत अमित कुमार यांच्या पुढाकाराने ना.उदयजी सामंत सॅमसंग, एल जी, ह्युंदाई, योसंग, चैन्गशीन ह्या कंपनीना भेट देऊन महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत बैठक करणार आहेत. या परदेशाच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या गुंतवणुकीमध्ये नक्कीच भर पडणार असल्याचे मत उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांनी व्यक्त केला आहे.यावेळी
भारताचे दक्षिण कोरियातील राजदूत श्री. अमित कुमार ह्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान केले.
यां दौऱ्या दरम्यान उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या समवेत,प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, दक्षिण कोरियाचे प्रथम सचिव स्वप्नील थोरात उपस्थित होते.