
जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.परशुराम निवेंडकर
तब्बल ३४ वर्षांनी रत्नागिरी तालुक्याला संधी
रत्नागिरी :महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेची नूतन कार्यकारिणी केंद्रीय राज्यकारणी अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली
नुकतीच बिनविरोध निवडण्यात आली.जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ.परशुराम निवेंडकर यांची निवड करण्यात आली असून डॉ. निवेंडकर यांच्या रूपाने रत्नागिरी तालुक्याला तब्बल ३४ वर्षांनी जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे.
जिल्हा कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून मंगला पराडके, मदन जानवलकर, उपाध्यक्ष विजय मालगुंडकर, अक्षदा पाटणकर, सचिव दिपक गोरीवले, सहसचिव अभिजित मोडसिंग, कोषाध्यक्ष विनोद जाधव, सहकोषध्यक्ष विवेक गावडे यांची निवड करण्यात आली आहे.तर जिल्हा संघटक मंडणगड राजेंद्र जाधव,जिल्हा संघटक दापोली अभिजित गोरोले, जिल्हा संघटक अभय देसाई, जिल्हा संघटक चिपळूण भरत गांधी, आशा खामगावकर, जिल्हा संघटक गुहागर वैभव जाधव, जिल्हा संघटक रत्नागिरी शैलेश वाघाटे, जिल्हा सल्लागार श्रीशंकर केतकर व नरेश ईदाते, राज्य सदस्य गजानन साळुंखे, प्रवीण बेलोसे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.