
कोळथरे येथील फार्म हाऊसवर चोरी
दापोली:- तालुक्यातील दाभोळ पोलिस हद्दीत कोळथरे सडा येथील फार्म हाऊस फोडून सुमारे १० हजार ४०० रुपयांची चोरी केल्याची घटना बुधवार दि. २ ऑगस्ट रात्री ८ ते शनिवार ५ ऑगस्ट सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.
दाभोळ पोलिस ठाण्यात विराज आगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याने कोळथरे सडा येथे असणाऱ्या फार्म हाऊसमध्ये खिडकी तोडून फार्महाऊसमध्ये प्रवेश करून फार्म हाऊसमध्ये असणारे साहित्य चोरून नेले. चोरीच्या मध्ये ६००० रुपये रोख रक्कम, १००० रुपये किमतीच्या दोन बादल्या, २००० किमतीचे चार टर्कीस टॉवेल, १००० रुपये किमतीचा किचनमधील सुरींचा सेट, ४०० रुपये किमतीची झाडे कट करण्याची कात्री असा सुमारे दहा हजार चारशे रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.