
महसूल दूत संकल्पनेतून योजना सामान्यांपर्यंत पोहचवा -डाॕ महेंद्र कल्याणकर
रत्नागिरी, : महसूल दूत या संकल्पनेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा. असे निर्देश देतानाच कोकण विभागीय आयुक्त डाॕ. महेंद्र कल्याणकर यांनी राजापूर उप विभागीय कार्यालयाच्या कामांविषयी समाधान व्यक्त केले.
कोकण विभागीय आयुक्त डाॕ. कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या समवेत राजापूर येथे भेट देऊन महसूल सप्ताह मधील कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
राजापूर उपविभाग मध्ये १ ऑगस्ट पासून राबविलेल्या उपक्रमाची माहिती उप विभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली. याबाबत विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार शीतल जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
