
कोकण रेल्वे मार्गावर ८ रोजी तीन तासांचा ‘मेगा ब्लॉक’
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी येत्या ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरून धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. तिरुनेलवेली- जामनगर (गाडी क्र. १९५७७) या ७ ऑगस्ट रोजी प्रवास सुरू होणाऱ्या एक्स्प्रेसला ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे. तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस (गाडी क्र. १६३४६) ठोकूर ते रत्नागिरी स्थानकादरम्यान १ तास थांबवून ठेवली जाणार आहे.